विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक भास्कर नागरे काळाच्या पडद्याआड

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

तळेगाव दाभाडे येथील नागरे अ‍ॅक्सिडेंट अ‍ॅन्ड जनरल हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. नितीन नागरे यांचे वडिल तसेच सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, संगमनेर या विद्यालयाचे माजी प्राचार्य भास्कर भीमराज नागरे (वय 68) यांचे गेल्या 22 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी निवृत्त कलाशिक्षिका श्रीमती मंगला, डॉ. नितीन नागरे आणि उद्योजक गोपाळ नागरे अशी दोन मुले; तसेच डॉ. सुरभी व उद्योजिका वनिता या दोन सुना आणि विवाहित मुलगी रोहिणी सोनार, जावई सतिश सोनार, नातवंडे असा परिवार आहे.

विद्यार्थीप्रिय व आदर्श कलाशिक्षक म्हणून सुपरिचित असलेल्या नागरे सरांनी वडगावपान येथील जनता विद्यालायात अनेक वर्षे चित्रकलेच्या ज्ञानदानाची सेवा केली.

भास्कर नागरे यांनी चित्रकलेतील उच्चस्तरीय जी. डी. आर्ट ही पदवी संपादित केली होती. आपल्या चित्रकलेच्या निष्णात ज्ञानाच्या जोरावर अनेक कला विद्यार्थी घडविले. कलेचा अधिक फायदा विद्यार्थ्यांना करून देत प्राविण्य मिळवून दिले. त्यांनी आजवरच्या कलाशिक्षक सेवेदरम्यान निरपेक्ष सेवाभावाने ज्ञानदानाचे काम केले. निर्व्यसनी, शांतताप्रिय, तसेच विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक काळाच्या पडद्याआड गेल्याने विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षक वर्ग, मित्र वर्ग, आप्तेष्ट, नातेवाईक व नागरे कुटुंबियांवर शोककळा पसरली.


Share this Newz