The Newz Biz Team, PUNE
भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्स ने शेतक-यांची प्रगती आणि सुदृढ भारतीय समाजाचा विकास या बाबतीत कृतिशील आघाडी घेतली आहे. कोरोना च्या दुस-या भयंकर लाटेमुळे सर्वांचीच पुन्हा एकदा कसोटी लागली आहे आणि अशा स्थितीत भारतीय नागरिकांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने त्याना या महामारीचा सामना करण्याची क्षमता मिळावी, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सोनालिका करीत आहे.
भारताच्या कोव्हिड-१९ विरुद्धच्या लढाईत योगदान म्हणून सोनालिकाने सेंट स्टीव्हन्स हॉस्पिटल पेशंट वेल्फेअर सोसायटी, नवी दिल्ली, येथे रुग्णांच्या रक्षणासाठी साह्य करण्याची सिद्धता ठेवली आहे. या कसोटीच्या काळात कोव्हिड -१९ रुग्णांना आधार देण्यासाठी सेंट स्टीव्हन्स हॉस्पिटल शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. याला जोड म्हणून सोनालिका तर्फे हॉस्पिटलमध्ये पीएसए ऑक्सिजन यंत्रणा उभारली आहे.
सोनालिकाचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले, कठीण स्थितीत सर्वानाच एकजुटीने काम करणे गरजेचे असते. रुग्ण वाचवण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी सर्वानी आपले प्रयत्न आणखी जोमदार करण्याची गरज आहे. सेंट स्टीव्हन्स हॉस्पिटलमध्ये पीएसए ऑक्सिजन यंत्रणा उभारून आम्ही एक एक क्रांती सुरू केली आहे आणि आम्ही सर्वच उद्योगसमूहांना आणि उद्योगपतींना एक एक हॉस्पिटल दत्तक घेण्याचे आवाहन करीत आहोत. देशातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन यंत्रणा उभारून आपण ऑक्सिजनच्या अभावामुळे आणखी मृत्यू होऊ नयेत, ही खबरदारी घेऊ शकतो.
देशातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन यंत्रणा उभारणे हे अवघड काम आहे, परंतु अशक्य नाही. आम्ही हे अभूतपूर्व पाऊल उचलून, एकजुटीने काम केल्यास आपला देश भविष्यातील अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करू शकतो हे दाखवून दिले आहे. या कसोटीच्या काळात कोव्हिड -१९ रुग्णांना आधार देण्यासाठी सोनालिका वचनबद्ध आहे. या साथीच्या प्रारंभापासूनच कंपनीने सेंट स्टीव्हन्स हॉस्पिटलला सातत्याने आधार दिला आहे. कोव्हिड -१९ रुग्णांना आधार देण्यासाठी आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सेंट स्टीव्हन्स हॉस्पिटल शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. कंपनीने २०२० मध्ये या साथीच्या प्रारंभापासून सेंट स्टीव्हन्स हॉस्पिटलला सातत्याने आधार दिला आहे. आजवर कंपनीने हॉस्पिटलला या यंत्रणेसह दिलेल्या साह्याची रक्कम १ कोटी ६० लाख आहे. प्रत्येकाचेच आरोग्य मोलाचे आहे आणि आपण सर्वानी मानवजातीच्या रक्षणासाठी शक्य तेवढे साह्य दिले पाहिजे.







Leave a Review