कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान, कादंबरी प्रतिष्ठान व रुद्रराज महीला प्रतिष्ठान तर्फे आई गौरव पुरस्कार वितरण

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान कादंबरी प्रतिष्ठान व रुद्रराज महीला प्रतिष्ठान च्यावतीने दापोडी येथे जागतिक मातृदिनानिमित्त आई गौरव पुरस्कार 2021 देण्यात आला. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले (नाणी) व नगरसेविका स्वातीमाई काटे पिं.चिं.मनपा यांना विशेष आर्दश माता पुरस्कार २०२१ माधवी बाईत, अस्मिता कांबळे (मोरे), सुप्रिया साळवी (काटे) यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच डॉ. जयश्री शेलार, संगिता पाचंगे, निलवंती गायकवाड,  चंद्रभागा भाडाळे, सावित्री काटे, सुवर्णा वीर (वडघुले), हिराबाई काटे या मातांचा सन्मान उपमहापौर हिराबाई घुले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी उपमहापौर हिराबाई घुले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, की आईचा आशीर्वाद, आईचे प्रेम हेच आजच्या मुलांसाठी सर्वस्व आहे. आजच्या प्रत्येक सुनांनी आपल्या पतीएवढे प्रेम आपल्या सासूवर करावे. सासूला स्वतःची आई समजावी. यामुळे घरात सुख शांती व आनंदी वातावरण राहते. आईचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद यामुळे आपल्या संसारात गोडी निर्माण होते. आपल्या मुलाला लहानपणापासून मोठे करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष असावे. स्वतःची मुले कसे वागतात, ते आईवडिलांनी पहाणे गरजेचे आहे. आई मुलांच्या नात्याबाबत बोलताना त्यांना गहीवरून आले.

यावेळी सरस्वती बाईत, पूनम काटे, सारीका जाधव, पूजा काटे, राजश्री बाईत, आश्विनी काटे, निर्मला बोधे,
रोहिणी काटे, शारदा पवार, स्वाती काटे, रचना बाईत, गौरी पवार, रूक्मिणी इंगवले, वैशाली जाधव, उज्ज्वला सावंत, सोनम जाधव, पल्लवी काटे, छाया कांबळे, गायत्री शिवले, सुजाता शिंदे, सुजाता बोधे, निर्मला काटे, शारदा मोरे, सुनिता नलवडे, मनिषा मोरे, सुरेखा मांदळे आदी महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भाडाळे यांनी, तर आभार रविंद्र बाईत यांनी मानले.


Share this Newz