The Newz Biz Team, SOLAPUR
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बार्शी येथे कोविड रूग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे अध्यक्ष अनिल धायगोडे व ट्रस्टचे जिल्हा माध्यम प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. विशेषतः सर्वाधिक रुग्णसंख्या बार्शी तालुक्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल धायगोडे व पांडुरंग भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये अन्न, पाणी या सर्व सुविधा चांगल्या असाव्यात. रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड थांबविण्यात यावी. सध्यस्थितीमध्ये वाढती रूग्ण संख्या पाहता बार्शी शहर व परिसरात तात्पुरत्या स्वरूपात एक जम्बो कोविड सेंटर चालू करावे. तसेच खाजगी रूग्णालयातील बेड ताब्यात घेऊन कोविड रूग्णांची व्यवस्था करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.







Leave a Review