The Newz Biz Team, PUNE
ट्रॅक्टर उद्योगात अद्ययावत तंत्रज्ञान आणण्याच्या दिशेने मोठी झेप घेत इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड (आयटीएल)ने प्रगत सोलिस हायब्रिड ५०१५ हा जपानी तंत्रज्ञानाने तयार झालेला ट्रॅक्टर बाजारात आणला आहे. ही किंमत भारतभर कोठेही एक्स शो रूम या तत्वावर आहे. आयटीएलने यानमार ऍग्रीबिझनेस या जपानी कंपनीच्या भागीदारीत हा तंत्रज्ञानातील चमत्कार ठरेल असा, तीन ट्रॅक्टरचे फायदे देणारा ट्रॅक्टर विकसित केला आहे.
आयटीएल ही इ पॉवरबूस्ट हे जपानी तंत्रज्ञान भारतात आणणारी पहिली ट्रॅक्टर उत्पादक ठरली आहे. सॉलिस यानमार श्रेणीतील या ट्रॅक्टरचे तंत्रज्ञानाचे स्वामित्व हक्क (पेटंट) कंपनीने घेतले आहेत. हा ट्रॅक्टर लॉंच करून आता आयटीएल सॉलिस यानमारचे फोर व्हील ड्राइव्हमधील सर्वोच्च स्थान पक्के करीत आहे.
नवीन सोलिस हायब्रिड ५०१५ हा ५० हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर पारंपरिक डिझेल इंजिन आणि वीज यांची शक्ती एकवटून ६० हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरची कामगिरी करून दाखविण्यासाठी सज्ज आहे. या भविष्यवेधी ट्रॅक्टरचे हेवी ड्यूटी मायलेज इंजिन इंधन मात्र ४५ हॉर्स पॉवर ट्रॅक्टरच्या इंजिन एवढे खर्च करते आणि इंधन खर्च वाचवते.
डॅश बोर्डवरचा पॉवर बूस्टर स्विच आणि हॅन्ड लिव्हर वापरून शेतकरी अगदी सहजपणे ट्रॅक्टरला अधिक शक्ती मिळवून देत त्याचे काम उंचावू शकतो. प्रगत वेहिकल कंट्रोल ऊर्जा वापरावर देखरेख करतो आणि शक्तिशाली मोटर मुळे ट्रॅक्टर ला चटकन गती पकडता येते. पॉवर बूस्टरमुळे सोलिस हायब्रिड ५०१५ ट्रॅक्टर त्याच्या हा त्याच्या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आणि अजोड कामगिरी करणारा ट्रॅक्टर बनला आहे.
कंपनीच्या या परिवर्तनशील प्रवासाबद्दल आयटीएलचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले, प्रगत देशात उपलब्ध असलेले नव्या युगाचे तंत्रज्ञान भारतातील शेतक-यांना किफायतशीर किमतीला उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तीन ट्रॅक्टरची कामगिरी करणारा सोलिस हायब्रिड ५०१५ ट्रॅक्टर सादर करून आम्ही या उद्योगात नवा मानदंड स्थापन केला आहे. हायब्रिड ट्रॅक्टरमध्ये असलेल्या लिथिअम इऑन बॅटरी आणि प्रगत मोटर यांमुळे प्रदूषण कमी होते आणि शेतक-याला उत्तम उत्पादकतेचा आत्मविश्वास मिळतो. हाय व्होल्टेज ट्रॅक्टर बॅटरी साध्या घरगुती वापराच्या १६ए सॉकेट प्लग ने ३ तासात पूर्ण चार्ज करता येते. या वैशिष्ट्यांमुळेच हा ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टरचे फायदे देतो.











Leave a Review