The Newz Biz Team, PUNE
एकीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की कोविड १९ प्रतिबंधात्मक लसी शिल्लक असूनही जाणीवपूर्वक केंद्र बंद केले जात आहेत. फडणवीस यांचे म्हणणे खरे असेल तर त्यांचीच म्हणजे भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने ९ एप्रिल २०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्र का बंद ठेवली आहेत ? असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
विशेष म्हणजे त्यांचीच सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला लसींचा साठा उपलब्ध नसल्याने ९ एप्रिल २०२१ रोजी सदर सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. तसे प्रसिद्धीपत्रक महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी काढले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ५९ लसीकरण केंद्रामार्फत सुमारे १ लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे, तर खाजगी २८ लसीकरण केंद्रामार्फत ५० हजार ७७७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरातील एकूण २ लाख ३० हजार ८६९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
सध्या लसींचा साठाच उपलब्ध नाही. मात्र, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, की लसींचा साठा उपलब्ध असूनही केवळ केंद्र सरकारला टार्गेट करण्यासाठी राज्य सरकार लसींचा साठा संपल्याची खोटी माहिती देत आहे.
असे असेल तर पिंपरी चिंचवड महापालिकेने लसींचा साठा संपल्याचे सांगितले आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या.
तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे.
91 लाख लसी वापरल्या.
म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत.
मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय❓
(2/n) #MaharashtraHasVaccines pic.twitter.com/BA4MMK2t1S— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2021







Leave a Review