The Newz Biz Team, PUNE
शासन आणि प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत मार्केट यार्डातील गुळ-भुसार, भाजीपाला, फळे, फुले, कांदा-बटाटा, केळी आणि पान बाजार शनिवार आणि रविवारी बंद असणार आहे. तसेच मांजरी, उत्तमनगर आणि मोशी येथील उपबाजारही बंद असणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी विक्रीसाठी शेतीमाल आणू नये, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. संपूर्ण शहर बंद असणार असल्याने विक्रीअभावी शेतकर्यांच्या मालाचे नुकसान होऊ शकते. तसेच मालही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहु शकतो. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी मार्केटयार्डातील सर्व विभाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केला आहे.







Leave a Review