प्रशांत शितोळे यांच्या प्रयत्नातून सांगवीत कोविड 19 मोफत लसीकरण केंद्र 

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या प्रयत्नातून जुनी सांगवी येथे कोविड 19 मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जुनी सांगवी येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापालिका शाळा, सांगवी रुग्णालय, कै. शकुंतलाबाई शितोळे शाळा या तीन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. याचबरोबर दापोडी, पिंपळे गुरव येथे लसीकरण केंद्र सुरू आहेत.

सामाजिक राजकीय मंडळींनीही जनजागृती करून पुढाकार घेतल्याने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे काही नागरिक लसीकरणाबाबत विनाकारण भीती बाळगत होते. यामुळे लसीकरण काही ठिकाणी संथ गतीने सुरू होते. मात्र, सामाजिक, राजकीय मंडळींकडून जनजागृती होत असल्याने परिसरात लसीकरणासाठी नागरीक पुढे येत आहेत. लसीकरण ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येत असल्याने नागरिकांनी थेट लसीकरण केंद्रावर आधार कार्ड घेवून जाऊन लस घ्यावी, असे महापालिका रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. नागरिकांनी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर यांनी केले.

आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही खबरदारी घ्या’, या उपक्रमांतर्गत दिव्यांगाना आमच्याकडून लसीकरण केंद्र ते घर अशी ये जा करण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घ्यावे.

          -प्रशांत शितोळे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

Share this Newz