महापौर माई ढोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

कोविड 19 महामारीमुळे गेले वर्षभर शाळांना सुट्टी देण्यात आली होती. कोविड19 चा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकार व महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

आज पहिल्याच दिवशी गुरूजन व विद्यार्थी मित्रांनी शाळेचा आनंद घेण्यासाठी शाळेमध्ये हजेरी लावली. पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी सांगवीतील महापालिका शाळा व नृसिंह हायस्कूल येथे जाऊन विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क व गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या आनंदात सहभागी झाले.

 


Share this Newz