राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने दत्तात्रय भोसले सन्मानित 

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

मूळचे बारामतीचे असलेल्या आणि सध्या पिंपरी-चिंचवड शहरात एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले उद्योजक दत्तात्रय भोसले यांना मुंबई येथील छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच यांच्या तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रोहाना भवन मुंबई येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार मुंबईचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस राज खतीब, अमित गडांकुश, पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांच्या हस्ते दत्तात्रय भोसले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपवरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार भोगळे, संभाजी माने, अरूण पिसाळ, सिहान बोरा, गिरीश जाधव, नगरसेवक रामदास पवळे, अपर्णा पाटील, सौरभ शिंदे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

कोणतेही काम सर्वस्व पणाला लावून करणे, परिस्थितीचे भांडवल करीत न बसता जिद्दीने कसे पुढे जायचे, याचा वस्तुपाठ म्हणजे दत्तात्रय भोसले, अशा शब्दात आयोजकांनी भोसले यांचा गौरव केला.


Share this Newz