The Newz Biz Team, PUNE
क्रीडाशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविल्याची पोचपावती म्हणून सुनील साठे यांना मुंबई येथील छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रोहाना भवन मुंबई येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार मुंबईचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस राज खतीब, अमित गडांकुश, पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांच्या हस्ते सुनील साठे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपवरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार भोगळे, संभाजी माने, अरूण पिसाळ, सिहान बोरा, गिरीश जाधव, नगरसेवक रामदास पवळे, अपर्णा पाटील, सौरभ शिंदे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
सुनील साठे यांनी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत राहत अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविले आहे. या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, अशा शब्दात आयोजकांनी सुनील साठे यांचा गौरव केला.







Leave a Review