The Newz Biz Team, PUNE
लेंडिंगकार्ट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या भारतातील आघाडीच्या फिनटेक कंपनीने आज त्यांच्या लेंडिंगकार्ट एक्सएलआर8 या बहुमाध्यम भागीदार व्यासपीठाच्या सादरीकरणाची घोषणा केली. ही आघाडीची फिनटेक कंपनी आपले तंत्रज्ञान आपल्या भागीदारांसाठी खुले करत आहे. यामुळे भागीदारांना लेंडिंगकार्टच्या एमएसएमईच्या व्यापक संपर्काचा लाभ घेता येणार आहे.
एमएसएमई आपल्या व्यवसायातील भांडवलासाठी ऑनलाइन ब्राऊझिंग करतात. लेंडिंगकार्ट एक्सएलआर8 च्या एपीआय सुटमुळे या ऑनलाइन भागीदारांना आपल्या कर्ज स्थितीची माहिती त्यांच्या स्वत:च्या व्यासपीठावर देणे शक्य होणार आहे आणि एसएएएस व्यासपीठामुळे ऑफलाइन भागीदार आणि एजंट्सना एक थांबी पर्याय उपलब्ध होतो आणि त्यातून ते स्वत:ला निर्मिती, व्यवहार पूर्ण करण्यासाठी साह्य करू शकतात, तसेच या व्यासपीठामुळे लेंडिंगकार्टच्या खास झीरो टच तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो. त्यामुळे कमीतकमी कागदपत्रे आणि संपर्कासाठी कोणत्याही ऑफलाइन माध्यमावर अवलंबून न राहिल्याने अर्जांची प्रक्रिया वेगवान होण्यात साह्य होते.
लेंडिंगकार्ट एजंट्स, बाजारपेठा आणि विविध व्यासपीठांसोबत भागीदारी करून एमएसएमई क्षेत्रात उपलब्ध वित्त उत्पादने, तारण शुल्क, लवचिकता आणि योग्य दरातील पर्याय यासह व्यावसायिक गरजा आणि पद्धतींनुसार वैयक्तिक उत्पादने यासंदर्भात जागरुकता निर्माण केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात लेंडिंगकार्टने या भागीदारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी वापरता येतील अशा तांत्रिक क्षमता जोखण्यावर भर दिला. अर्जाच्या स्थितीची रीअल टाईम माहिती, कुठेही काहीही अडलेले असल्यास किंवा साह्य वा अडचणींसाठी रीलेशनशीप मॅनेजर्सवर अवलंबून ऑफलाइन संवाद कमी करणे या व्यासपीठामुळे शक्य झाले.
लेंडिंगकार्ट टेक्नॉलॉजिसचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन लुनिया म्हणाले, डिजिटल माध्यमांतून एमएसएमईजसाठी उपलब्ध असलेल्या तारणमुक्त वित्त पर्यायांसाठी बहुमाध्यम सेवा निर्माण करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जागरुकता आणण्यासाठी आमच्या भागीदारांसोबत असलेली लेंडिंगकार्टची भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. पाच वर्षांहून अधिक काळच्या या प्रयत्न आणि उपक्रमांमुळे न्यू नॉर्मल स्थितीत फार चांगला परिणाम साधला गेला आणि या प्रचंड क्षमता असलेल्या बाजारपेठेतील कर्ज उपलब्धतेतील दरी भरून काढण्यात आम्ही नवे मापदंड रचण्यात अग्रणी असणार आहोत.











Leave a Review