The Newz Biz Team, Pune
पुणे-स्थित रियाल्टर गोयल गंगा डेव्हलपमेंट्स ने गार्डियन डेव्हलपर्स चे तीन येऊ घातलेले प्रकल्प विकसनासाठी घेतले आहेत. हे प्रकल्प न्यू वाघोली, हिंजवडी आणि आंबेगाव-कात्रज येथे आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रामधील, विशेषतः पुण्यात, प्रस्थापित आणि नावाजलेले असल्यामुळे गोयल गंगा डेव्हलपमेंट्सकडे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या विकसन-व्यवस्थापन (डेव्हलपमेंट-मॅनेजमेंट) माॅडेलची विचारणा करण्यात आली होती. पुरेशा कालावधीत यथोचित चर्चा करून आणि सर्वांगाने आढावा घेतल्यानंतर गोयल गंगा डेव्हलपमेंट्स ने गार्डियन डेव्हलपर्सच्या न्यू वाघोली, हिंजवडी आणि आंबेगाव-कात्रज या तीन ठिकाणांवरील प्रकल्प हाती घेण्यास मंजुरी दिली.
गोयल गंगा डेव्हलपमेंट्स (जीजीडी) आणि गार्डियन डेव्हलपर्स यांच्यात झालेल्या अधिग्रहण कराराचे एकूण मूल्य हे शंभर कोटी रुपये आहे. एनबीसी पिरामल ग्रुपच्या सक्षम पाठिंब्याच्या जोरावर गोयल गंगा डेव्हलपमेंट्स तर्फे केली जाणारी या प्रकल्पाची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली जातील. विशेष म्हणजे, पुणे शहरातील १ कोटी चौरस फूटाचे बांधकाम गोयल गंगा डेव्हलपमेंट्सने (जीजीडी) आतापर्यंत पूर्ण केले आहे. नुकत्याच अधिग्रहण कराराने हाती घेतलेल्या या प्रकल्पांच्या यशस्वीरित्या पूर्ण होण्याबाबतही जीजीडीला खात्री आहे.
या करारावर सही करण्याचा निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट करताना गोयल गंगा डेव्हलपमेंट्सचे (जीजीडी) अध्यक्ष अनुज गोयल म्हणाले, या तीन ठिकाणांना असलेल्या मागणीबरोबरच असा महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य वेळ सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.
प्रकल्पांविषयी माहिती देताना गोयल म्हणाले, जेव्हा जीजीडीने न्यू वाघोली येथील हिलशायर प्रकल्पामध्ये लक्ष घातले तेव्हा त्या प्रकल्पाचे काम संपलेलेदेखील नव्हते. जीजीडीमधील माझ्या सक्षम सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन व तीन बीएचके घरांमध्ये राहणाऱ्या २०० कुटुंबांसाठी काम केले.
पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लि.चे (पीसीएचएफएल) व्यवस्थापकीय संचालक खुशरू जिजिना म्हणाले, अधिकाधिक ग्राहकांचे समाधान आणि दर्जेदार कामाप्रती असलेली वचनबद्धता यामुळेच पिरामल आणि गोयल गंगा डेव्हलपमेंट्सची भागीदारी यशस्वी झाली आहे.







Leave a Review