तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन 

Share this Newz

The Newz Biz Team, Pune 

तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तानाजी जवळकर, तृप्ती जवळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या दिनदर्शिकेमध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील कामगिरी विषयी माहिती देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेच्या दहा हजार प्रतीचे वाटप पिंपळे गुरव प्रभागातील नागरिकांना नववर्षानिमित्त करण्यात येत आहे.


Share this Newz