श्याम भाऊ जगताप यांच्या दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष श्याम जगताप यांच्या दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी शाम जगताप यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक दत्तोबा लांडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक श्‍याम लांडे, पिंपरी-चिंचवड महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, मिलिंद काटे, माजी नगरसेवक किरण मोटे, सतीश लांडगे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका शोभा ताई आदियाल , प्रभाग अध्यक्ष तृप्ती तानाजी जवळकर, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, प्रवक्ता भागवत जवळकर ,युवा नेते अमरसिंग आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, संदीप नलावडे, अक्षय जगताप साहिल कोकाते आदी उपस्थित होते.


Share this Newz