The Newz Biz Team, Pune
हप्त्याने नाही आणि महिन्यानी नाही, लॉकडाऊन काळातील वीजबिल भरायला आम्हाला जमणार नाही, अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काटेपुरम चौक, गुरव पिंपळे येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
वाढीव वीजबिलांबाबत नागरिकांकडून मनसेकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या वीजबिलाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसेने विचारणाही केली आहे. मात्र, दखल न घेतल्याने जमा झालेल्या वीजबिलाची होळी करण्यात आली. कोरोना महामारी नियमांचे पालन करत काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्ष राजू सावळे, उपविभाग अध्यक्ष अनिल भुजबळ, प्रभाग अध्यक्ष प्रदिप गायकवाड, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट, वार्ड अध्यक्ष प्रकाश हादवे, शाखा उपाध्यक्ष गोविंद वाल्हेकर, म.न.से. सदस्य विजय खंदारे, राहुल खंदारे आदी उपस्थित होते.







Leave a Review