The Newz Biz Team, Pune
‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ने ‘एसबीआय लाइफ-स्मार्ट फ्युचर चॉईसेस’ ही बचत योजना बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांची विम्याची वाढती गरज लक्षात घेऊन, ही वैयक्तिक स्वरुपाची, नॉन लिंक्ड, पार्टिसिपंट आयुर्विमा बचत योजना सादर करण्यात आली असून, ग्राहकांना पॉलिसीच्या मुदतीत वेळोवेळी आपल्या बदलत्या गरजांनुरुप पॉलिसीतील विविध पर्याय व लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य या योजनेंतर्गत मिळणार आहे.
आपल्या प्रीमिअमची रक्कम किती असावी, पॉलिसीची मुदत किती हवी, किंवा प्रीमिअम भरण्याचा कालावधी किती असावा, याबाबतचे पर्याय ग्राहकांना ‘एसबीआय लाइफ-स्मार्ट फ्युचर चॉईसेस’मधून मिळणार आहेत. तसेच, आपल्या बदलत्या गरजा व आवश्यकतांनुसार आयुर्विमा योजनेतील विविध वैशिष्ट्यांचा आढावा घेण्याची क्षमतादेखील त्यांना प्राप्त होणार आहे. त्यांच्या विकसीत होणाऱ्या आवश्यकतांनुसार नियमित रोख बोनस आणि पेआऊट्सदेखील त्यांना मिळू शकतील. या योजनेच्या तुमचे तुम्हीच करा या स्वरुपामुळे नव्या पिढीला ती आकर्षक वाटू शकेल. या नवीन पिढीला विमा योजनांच्या पूर्वी निवडलेल्या लाभांशी बांधिलकी नको असते, तर पॉलिसीच्या संपूर्ण काळात किंवा मॅच्युरिटीच्या वेळी लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य तिला हवे असते. त्यायोगे आयुर्विमा बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या या वैशिष्ट्यांचा लाभ घेण्याची या पिढीची आंतरिक गरज पूर्ण होते.
‘एसबीआय लाइफ-स्मार्ट फ्युचर चॉईसेस’ ही योजना सादर करताना एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे झोन क्र. १ चे प्रमुख रवी कृष्णमूर्ती म्हणाले, “एसबीआय लाइफने नुकताच एक आर्थिक शक्ती वाढविण्याबाबत ग्राहकांची मानसिकता समजून घेणे या आशयाचे सर्वेक्षण घेतले. त्यामध्ये, आर्थिक संरक्षणाबाबतच्या नागरिकांच्या गरजा अधोरेखित झाल्या आहेत. व्यक्ती म्हणून आपण जीवनातल्या निवडींवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याची आस धरतो, यामुळे आपल्यामध्ये सशक्तीकरणाची भावना निर्माण होते.
आपले आयुष्य आपल्या मर्जीनुसार कसे घडवायचे, हे ठरविण्याची शक्ती व तसे लाभ ग्राहकांना मिळवून देण्याचे उद्दिष्ट आम्ही एसबीआय लाइफच्या ‘स्मार्ट फ्यूचर चॉईसेस’च्या माध्यमातून ठेवले आहे. आपण खरेदी केलेल्या उत्पादनांवर आपलेच नियंत्रण असावे अशी आकांक्षा असणाऱ्यांसाठी ही नवी योजना आदर्श आहे. आयुष्यात प्रगती होत जाईल, तशा गरजाही बदलत जातील, त्या अनुषंगाने या योजनेमध्ये काही वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ज्यांना निवडीचा मूलभूत हक्क हवा आहे, अशा अनेक संभाव्य ग्राहकांना ‘स्मार्ट फ्युचर चॉईसेस’तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
पॉलिसी घेतल्यापासून तिच्या संपूर्ण कालावधीत ती आपल्या विविध गरजांनुसार बदलण्याची स्वायत्तता ग्राहकांना देण्याचा प्रयत्न एसबीआय लाइफने ‘स्मार्ट फ्युचर चॉईसेस’च्या माध्यमातून, आपल्या ग्राहककेंद्रित धोरणानुसार केला आहे. यातून ग्राहक आपल्या भविष्यातील योजना प्रभावीपणे तयार करण्यास सक्षम होतील.
एसबीआय लाइफ-‘स्मार्ट फ्यूचर चॉईसेस’ योजनेची प्रमुख वैशिष्ट्येः
1) ही योजना ‘क्लासिक चॉईस’ आणि ‘फ्लेक्सी चॉईस’ या दोन लाभांसह उपलब्ध आहे.
2) ‘क्लासिक चॉईस’ प्रकारात पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी एकरकमी विमाराशी मॅच्युरिटी लाभांसह मिळते आणि पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत आयुर्विम्याचे कवच पुरविले जाते. ‘फ्लेक्सी चॉइस’ या प्रकारात, सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून मूळ विमाराशी नियमितपणे टप्प्याटप्प्याने दिली जाते, तसेच मुदतीच्या अखेरीस विम्याचे कवच समाप्त होत असताना मॅच्युरिटीचे लाभ दिले जातात.
- a) प्रीमियम भरण्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही एका पर्यायातून दुसऱ्या पर्यायाकडे वळण्याची सुविधा पॉलिसीधारकाला मिळू शकते.
3) रोख बोनस दरवर्षी घेण्याचा किंवा आपल्या पसंतीनुसार तो नंतर घेण्याचा पर्याय या योजनेमध्ये ग्राहकाला दिला जातो. हा बोनस कंपनीकडे एक मोठा निधी म्हणून जमा राहतो. पॉलिसीधारकाच्या मागणीनुसार, पॉलिसीच्या मुदतीत कोणत्याही टप्प्यावर, गरज भासेल तेव्हा ही बोनसची रक्कम त्याला मिळू शकते. बचत करून साठवलेल्या एखाद्या मोठ्या रकमेप्रमाणे हा बोनस त्यावेळी पॉलिसीधारकाच्या उपयोगी पडतो.
- a) नंतर घ्यावयाच्या पे-आऊटच्या रकमेवर तेवढ्या काळापुरते पॉलिसीधारकाला ‘रिव्हर्स रेपो’च्या दराने व्याज मिळू शकते.
- b) यातील ‘ऑटो कव्हर’ या वैशिष्ट्यानुसार, पुढील प्रीमियम न भरण्याच्या परिस्थितीत, 2 वर्षे प्रीमियम भरलेले असल्यास 1 वर्षाचे आणि 5 वर्षे प्रीमियम भरलेले असल्यास 2 वर्षांचे अतिरिक्त विम्याचे कवच मिळू शकते.
4) ग्राहकाने लाभ हा पर्याय निवडला असल्यास, त्याला ‘सर्व्हायव्हल बेनिफिट्स’ किंवा ‘एकरकमी लाभ’ देण्याची व्यवस्था या योजनेमध्ये आहे.
5) मॅच्युरिटी बेनिफिट्स : ‘क्लासिक चॉइस’ प्रकारात प्रीमियम भरण्याचा कालावधी, ग्राहकाचे वय आणि त्याने निवडलेली पॉलिसीची मुदत यांच्या आधारे मॅच्युरिटीवर निश्चित विमा राशी (जास्तीत जास्त 138 टक्के) त्याला देण्यात येते. ‘फ्लॅक्सी चॉइस’ अंतर्गत, ग्राहकाला मॅच्युरिटी लाभ संपूर्णपणे, एकरकमी मिळू शकतात, पे-आऊट्सच्या पद्धतीने ते हप्त्यांमध्ये मिळू शकतात अथवा त्याला वर्षासन खरेदी करता येते.
6) ‘मागणीनुसार पैसे’ या यातील अनोख्या सुविधेनुसार,
- a) दरवर्षी रोख बोनस पे-आऊट घेण्याचा किंवा तो घेण्याचे लांबणीवर टाकून आवश्यक असेल तेव्हाच काढून घेण्याचा व उर्वरीत रकमेवर व्याज कमावण्याचा पर्याय उपलब्ध.
- b) सर्व्हायव्हल बेनिफिट पे-आऊट लागू झाल्यावर तो काढून घेण्याचा किंवा तोदेखील घेण्याचे लांबणीवर टाकत आवश्यकतेनुसार काढण्याचा व त्याच्या उर्वरीत रकमेवर व्याज कमावण्याचा पर्याय उपलब्ध.
- प्रीमियम भरण्याचा कालावधी संपल्यावर 9 महिन्यांनी.
- बोनससाठी पात्र झाल्यावर, म्हणजे, 2 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर.
‘एसबीआय लाइफ’च्या ‘स्मार्ट फ्युचर चॉईसेस’विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/smart-future-choices







Leave a Review