The Newz Biz Team, तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि तुकाराम महाराज गाथा ग्रंथ देऊन डॉ. वाघमोडे यांना सन्मानित करण्यात आले.
प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश बोरुडे, संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, सल्लागार रमेश जाधव गुरुजी, कार्याध्यक्ष प्रा.महादेव वाघमारे, सचिव प्रा. ऋषीकेश लोंढे, प्रकल्प प्रमुख जगन्नाथ ऊर्फ काकासाहेब काळे, राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, प्रेस फोटोग्राफर चित्रसेन जाधव, अंकुश दाभाडे आदी उपस्थित होते.
अमरनाथ वाघमोडे यांनी व्यवस्थापन (मॅनेजमेंट) विषयातील अभ्यास पूर्ण प्रबंध सादर केल्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना पीएच.डी पदवी बहाल केली. पोलीस खात्यातील जबाबदारी सांभाळून हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल प्रेस क्लबच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्काराने मी भारावून गेलो असून, काम करण्याची अधिक प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन डॉ. वाघमोडे यांनी सत्काराला उत्तर देताना केले. प्रास्तावित ऋषकेश लोंढे यांनी केले. गणेश बोरुडे आणि विलास भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.







Leave a Review