The Newz Biz Team, Pune
शापूरजी पालोनजी समूह हे भारतातील रिअल इस्टेटमधील एक अग्रणी विश्वासार्ह नाव आहे. शेवाळेवाडी, पुणे पूर्व येथे ‘जॉयव्हिले’ या महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण ब्रँड अंतर्गत त्यांनी नवा निवासी गृहसंकुल प्रकल्प सुरू करत असल्याची घोषणा केली. या प्रकल्पाचे नाव ‘जॉयव्हिले हडपसर ॲनेक्स’ आहे.
‘जॉयव्हिले हडपसर ॲनेक्स’ प्रकल्प 21 एकरवर पसरला असून सोयीसुविधांनी युक्त अशा मध्यवर्ती ठिकाणी प्रत्येकी 22 मजल्यांचे 21 टॉवर्स इथे असणार आहेत. संपूर्ण प्रकल्पाचा विकास टप्याटप्प्याने केला जाणार आहे. सुरुवातीच्या योजनेनुसार, सुमारे 600 सदनिकांचे (1 बीएचके, 2 बीएचके आणि 3 बीएचके) काम नुकतेच सुरु करण्यात आले.
पात्र घर खरेदीदारांना निवडलेल्या सदनिकेवर प्रधानमंत्री आवास योजनेनुसार क्रेडीट लिंक्ड सब्सिडी स्कीमअंतर्गत (सीएलएसएस) 2.67 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेता येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन अतिशय विचारपूर्वक करण्यात आल्याने इथल्या रहिवाशांना झाडा-झुडपांनी हिरवीगार झालेली सुमारे 80% जागा मोकळी मिळणार आहे. 8 एकरपेक्षा जास्त मध्यवर्ती सुविधांची जागा ही वाहनांनी मुक्त असणार आहे. तिथे 60 हून जास्त अन्य सोई-सुविधा दिल्या असल्याने मुलांना खेळण्यासाठी, शिकण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन नव्या गोष्टी शोधण्याची संधी मिळू शकणार आहे. चार मिनी क्लबहाऊसेसच्या व्यतिरिक्त एक मास्टर क्लबहाऊस देखील देण्यात येणार आहे.
या प्रसंगी बोलताना, श्रीराम महादेवन (व्यवस्थापकीय संचालक, जॉयव्हिले शापूरजी हाऊसिंग) म्हणाले, “पूर्व पुणे भागातील बाजारात, विश्वासू ब्रँड्सच्या गुणावत्तापूर्ण महत्त्वाकांक्षी घरांना मोठी मागणी असल्याचे आम्ही अनुभवले आहे. स्थावर मालमत्ता विकासातील स्वत:च्या मोठ्या अनुभवाच्या बळावर शापूरजी पालोनजी समूह ही जागा आपल्या ताब्यात घेऊ इच्छित आहे.”
ते पुढे म्हणाले, “घर खरेदी प्रकारात आम्ही बदल अनुभवत आहोत आणि त्यामुळे या प्रकल्पाची सुरुवात करत असताना आम्हाला घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी कोणताही त्रास न होता घर खरेदीचा अनुभव देण्यासाठी ‘व्हर्चुओ’ हा ऑनलाईन मंच सुरू करावा लागला.”
हा प्रकल्प पुणे-सोलापूर महामार्गाशी चांगल्या प्रकारे जोडला गेला आहे आणि तोच महामार्ग पुढे मुंबई-पुणे महामार्गाला जोडला गेला आहे. पुण्याचे सर्वात मोठे आकर्षण असलेले एसपी इन्फोसिटी. मगरपट्टा आय टी पार्क आणि इऑन आय टी पार्क हे या प्रकल्पापासून अगदी जवळ आहेत. प्रकल्पाच्या जवळच विमानतळ, रेल्वे स्टेशन, शाळा, मॉल्स, हॉस्पिटल्स इ. सामाजिक पायाभूत सुविधा आहेत. ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्रासाठी ईडीजीईमध्ये या प्रकल्पाची नोंदणी करण्यात आली आहे.











Leave a Review