The Newz Biz Team, Pune
सीड्स या आघाडीच्या मानवतावादी संस्थेने हनीवेलसह अन्नपाकिटांच्या वाटपासाठी भागीदारी केली आहे. नऊ शहरांमध्ये कोरोनाच्या संकटाचा फटका बसलेल्या लोकांना 10.7 मिलियन अन्नपाकिटांचे वाटप केले जाणार आहे. लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेल्या रोजंदारी कामगार, कंत्राटी कामगार आणि स्थलांतरित मजूरांचा यात समावेश आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात पाच शहरांमध्ये सुमारे 3.7 मिलियन अन्नपाकिटे पुरवली गेली. तर, दुसऱ्या टप्प्यात दिल्ली, गुरगाव, बंगळुरु, पुणे, मदुराई, हरिद्वार, देहरादून, चेन्नई आणि हैदराबाद या अतिरिक्त 7 मिलियन अन्नपाकिटे पुरवली जाणार आहेत. या बहुशहरीय मोहिमेत एकूण 1.78 लाख लोकांना साह्य केले जाईल. देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर स्थलांतरित, वंचित आणि गोरगरिबांसाठी प्रचंड प्रमाणात मदत केली गेली. मात्र, देश हळूहळू पूर्वपदावर येत असताना मदतीचा हा ओघ लक्षणीय प्रमाणात आटत चालला आहे. आजही प्रचंड मोठ्या प्रमाणावर, विशेषत: स्थलांतरित मजूरांना बेरोजगारी आणि हाती काहीही शिल्लक न उरणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सीड्सचे चीफ ऑफ प्रोग्राम येजदानी रहमान म्हणाले, “कोविड-19 संकटाच्या काळात अगदी सुरुवातीपासून सीड्समध्ये आम्ही गरजूंच्या मदतीसाठी बांधिल आहोत. हे संकट अजूनही गंभीर आहे. त्यामुळे तगून राहण्याची धडपड करावी लागत आहे आणि यात विविध पातळ्यांवर लढणाऱ्यांसोबत आम्ही कायम ठामपणे उभे आहोत. अन्नधान्य वाटपाच्या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून हनीवेलच्या साह्याने आम्ही या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत आता या भागात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक फूड किटमध्ये तांदूळ, गव्हाचं पीठ, साखर, डाळी, खाद्यतेल आणि मीठ असेल.
पुणे हे मेट्रोपोलिटन हब असल्याने जगभरातील प्रोफेशनल्स या शहरात येतात. दुर्दैवाने, भारतातील कोविडचे सर्वाधिक रुग्ण या शहरात सापडले आणि उलट स्थलांतरामुळेही या शहराला बराच तडाखा बसला. अनेक पर्यटन स्थळांच्या मार्गावरील एक महत्त्वाचे शहर असल्यानेही या शहरावर मोठा परिणाम झाला आणि तो दीर्घकाळासाठी आहे.
हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडचे फॅसिलिटीज मॅनेजमेंट मॅनेजर श्री. जमशेदर करकरिया यांच्या उपस्थितीत पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा भागात अन्नधान्य वाटपाची मोहीम राबवण्यात आली. येत्या काही आठवड्यात सीड्सतर्फे या वितरण मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.











Leave a Review