The Newz Biz Team, नवी दिल्ली :
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पबजीसह (PUBG) 118 ॲप्सवर बंदी (apps ban) घातली आहे. मात्र, देशात पबजी खेळणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन पबजी’वरील बंदी सरकार हटवण्याची शक्यता आहे.
पबजी हे दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियोचे (Blue Hole Studio) app आहे. मात्र, या गेमची फ्रेंचायजी चिनी कंपनी टेन्सेंटकडे (Tencent) होती. ब्ल्यू होल स्टुडियोने टेन्सेंटकडे असणारी फ्रेंचायजी (Franchise) काढून घेतली आहे. आता हा गेम पूर्णपणे दक्षिण कोरियन (south korean) झाला आहे. त्यामुळेच पबजीवरील बंदी हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- रिलायन्स जिओला मिळणार डिस्ट्रिब्युशनचं काम ?
ब्ल्यू होल स्टुडिओ ही कंपनी रिलायन्स जिओला डिस्ट्रिब्युशनचे काम देऊ शकते. याबद्दलच्या करारासाठी सध्या प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू आहे. त्यामुळे अधिकृत निर्णय येण्यास काही दिवसांचा अवधी लागेल. ब्ल्यू होल स्टुडियोच्या एका ब्लॉगपोस्टमधून कंपनीची जिओ सोबत बोलणी सुरू असल्याचे समोर आले आहे.
- टिकटॉकही बंदीची कारवाई (tiktok)
पबजीसह ११८ ॲप्सवर बंदीची कारवाई करण्याआधी केंद्र सरकारने ५९ चिनी ॲप्सवर बंदीचा निर्णय घेतला होता. या ५९ ॲप्समध्ये लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप टिकटॉकचाही समावेश होता. गेल्या पाच महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सरकारने चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.







Leave a Review