The Newz Biz Team, मुंबई :
भारतीय स्टेट बँकेने आपल्या किरकोळ कर्जदार आणि गृहकर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढविण्यात येणार आहे. स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी (C.S.shetty) यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे अनेकांवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु या परिस्थितीमध्ये स्टेट बँकेने आपल्या किरकोळ कर्जदार आणि गृहकर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी (C.S.shetty) यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
१ मार्च २०२० पूर्वी ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यांनाच या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. स्टेट बँक कर्जाच्या पुनर्रचनेत पुढे असली, तरी येत्या काळात आयसीआयसीआय (ICICI BANK) आणि एचडीएफसीसारख्या (HDFC BANK) बँकांकडूनही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंतही या बँका अशी योजना आणू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेट्टी यांनी सांगितले, की कोरोनाचा फटका बसलेल्या व्यक्तींची नोकरी किंवा त्याचा रोजगार पुन्हा केव्हा सुरू याचा विचार करून त्यावर कर्जाच्या पुनर्रचनेचा कालावधी ठरवण्यात येईल. ग्राहकांच्या उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीला किती कालावधी देण्यात येईल यावर निर्णय घेण्यात येणार आहे.







Leave a Review