The Newz Biz Team : फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांच्या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आले आहे. ४०० जणांच्या या यादीत सलग तिसऱ्या वर्षी अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे १७९ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे, तर १११ अब्ज डॉलर्स संपत्तीसह बिल गेट्स यांना फोर्ब्सच्या यादीत दुसरे स्थान देण्यात आले आहे.
या यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे ६१ व्या स्थानावर आहेत. तर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे ३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह २३८ व्या स्थानावर आहेत. ऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत २९९ वे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे २.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे २.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ३५३ व्या स्थानावर आहेत. शेरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत ३५९ वे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
राकेश गंगवा यांनाही या यादीत ३५९ वे स्थान देण्यात आले असून, त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. याव्यतिरिक्त वर्क डेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अनिल भुसरी यांनादेखील ३५९ वे स्थान देण्यात आले असून, त्यांच्याकडेही २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.







Leave a Review