पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात कर्तव्यावर असणारे वैद्यकीय तज्ज्ञ, पॕरामेडीकल स्टाप आणि सफाई कर्मचारी हे खरे कोरोना योध्दा आहेत. त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या, थाळ्या वाजवून सन्मान करण्याबरोबरच अशा करोना योद्ध्यांना कोरोना काळात कर्तव्यावर असता ५० लाखाचे विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले होते.
देहुरोड छावणी परिषदेमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्या कोरोनाने मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटूंबाला ५० लाखाचे विमा संरक्षण रक्कमेबरोबरच देहुरोड छावणी परिषदेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी देहुरोड छावणी परिषदेचे रामस्वरुप हरीतवाल यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
देहुरोड छावणी परिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्यावरच कुंटुबाची उपजिवीका अवलंबून असल्याने कुंटूबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्यांना 50 लाखाची मदत मिळणे गरजेचे आहे.







Leave a Review