पुणे : भारतातील गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीचा मोठा भाग भारतातील इक्विटी बाजारात गुंतवलेला असल्याने त्यांनी 97% जागतिक इक्विटी संधी गमावल्या आहेत (जागतिक इक्विटी बाजारातील केवळ 3% भाग दर्शवला जातो).
जागतिक उत्पादनासाठी अॅक्सिस एएमसीने श्रॉडर्सशी (जी अॅक्सिस एएमसीमध्ये २५ टक्के हिस्साधारक आहे) सहयोग केला आहे. श्रॉडर्स ही जागतिक दर्जाची अॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅसेट मॅनेजर कंपनी असून ती युरोप, अमेरिका, आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका येथील ३५ ठिकाणी कार्यरत आहे व कंपनीची एयूएम ५२५. ८ अब्ज ब्रिटीश पौंड आहे.
अॅक्सिस एएमसीने गेल्या काही वर्षांमध्ये २ यशस्वी एमएफ योजना दाखल केलेल्या असून त्यांनी गुंतवणूकदारांना जागतिक स्तरावर गुंतवणुकीची संधी दिली आहे – अॅक्सिस ग्रोथ अपॉर्च्युनिटी फंड आणि अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड. अॅक्सिस ग्लोबल इक्विटी अल्फा फंड ऑफ फंड अॅक्सिस एएमसीने भारतात जाहीर केलेला पहिला विशेष जागतिक फीडर फंड आहे. अॅक्सिस ग्लोबल इक्विटी अल्फा फंड ऑफ फंड ही ओपन एंडेड फंड ऑफ फंड स्कीम असून ती श्रॉडर इंटरनॅशनल सिलेक्शन फंड ग्लोबल इक्विटी अल्फामध्ये गुंतवणूक करते.
श्रॉडर्स इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे ग्लोबल अँड थिमॅटिक इक्विटीज हेड, सीआयओ अॅलेक्स टेडर यांनी सांगितले, ‘हा फंड दाखल करण्यासाठी आम्हाला अॅक्सिस एएमसीशी भागीदारी करताना अतिशय आनंद होत आहे. जागतिक गुंतवणुकीमुळे संपत्तीसंचयाची संधी निर्माण होते, आणि अॅक्सिस ग्लोबल इक्विटी अल्फा फंडाने सल्लागारांना आणि त्यांच्या ग्राहकांना श्रॉडर्सच्या सर्वोत्तम जागतिक इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी निर्माण केली आहे.
अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश कुमार निगम यांनी म्हणाले कि २०० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या श्रॉडर्सबरोबरच्या भागीदारीने तयार करण्यात आलेला आमचा नवा फंड भारतीय गुंतवणूकदारांना अॅक्सिस एमएफ या सोयीच्या व सोप्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार जागतिक पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देणार आहे.’












Leave a Review