मुलांना शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘Sportz Village’चा ॲक्टिव्ह क्लब

Share this Newz

पुणे :

मुलांमध्ये टाळेबंदीच्या काळात स्क्रीन समोर बसण्याचे प्रमाण 100 टक्क्यांनी वाढलेले दिसते. त्यामुळे त्यांच्यात मायओपिया होण्याचे किंवा शारीरिक हालचालीच्या अभावामुळे वजन वाढण्याची भीती आहे. मुलांची शारीरिक हालचाल होऊन ती आनंदी राहावीत, या उद्देशाने Sportz Village (स्पोर्ट्झ व्हिलेज) या युवा क्रीडा मंचाने 4 ते 19 वयोगटातील मुलांसाठी अॅक्टीव्ह क्लब या विशेष कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या गुंतवून ठेवणाऱ्या सुदृढ आणि कौशल्य-आधारीत कार्यक्रमाद्वारे मुलांना घरातच शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचे स्पोर्ट्झ व्हिलेजचे उदिष्ट आहे.

अगदी कमी कालावधीत अॅक्टीव्ह क्लब प्रोग्राम’ने 1200 हून अधिक पालकांचा विश्वास संपादित केला आहे. सध्या शाळा अनिश्चित काळासाठी बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ऑफलाइन असलेल्या शाळा ऑनलाइन झाल्या. मात्र, खेळ आणि शारीरिक शिक्षणाच्या दृष्टीने ऑनलाइन पर्यायाचा स्वीकार झालेला दिसत नाही. मुलांनी आरोग्य, रोग प्रतिकारशक्ती तसेच आनंदासाठी खेळण्याची आवश्यकता आहे. त्यांनी घरालाच स्वत:चे नवे मैदान करणे ही काळाची गरज आहे.

मुलांच्या नियमित वेळापत्रकात क्रीडा तसेच तंदुरुस्तीचा सहभाग व्हावा आणि शारीरिक हालचालींबाबत सजगता निर्माण व्हावी, हे Active club प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून मुले आणि पालकांना विविध ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासाचे धडे सबस्क्राईब करता येतील. जिथे प्रमाणित करण्यात आलेले प्रशिक्षक विविध वयोगटातील मुलांना त्यांच्या वयानुसार, विशिष्ट खेळाचे आणि तंदुरुस्त राहण्यासाठी असलेले क्रियाकलाप शिकवतील, त्याशिवाय अभ्यासक्रमातील सर्व शारीरिक क्रियाकलाप स्क्रीनवर ठरावीक अंतरावरून शिकविण्यात येणार असल्याने डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.

अॅक्टीव्ह क्लब प्रोग्रामशी निगडीत तंदुरुस्ती विषयी बोलताना स्पोर्ट्झ व्हिलेज इंडियाचे चीफ क्वालिटी अँड परफॉरमन्स ऑफिसर, बोर्ड अॅडव्हायजर, जॉन ग्लोस्टर म्हणाले, की मुलांना गुंतवून ठेवायचा हा एक कल्पक मार्ग आहे. मुलांना योग्य वयात विविध क्रीडा तसेच शारीरिक क्रियाकलापांची गोडी लागली पाहिजे. खेळामुळे केवळ शिस्तशीर जीवनशैलीची खातरजमा राहत नाही, तर त्यामुळे मुलांमध्ये टीमवर्क (सांघिक कौशल्ये), नेतृत्व आणि आत्मविश्वास यांसारखी काही सामाजिक-भावनिक कौशल्ये देखील रुजतात.

याविषयी बोलताना स्पोर्ट्झ व्हिलेजचे सह-संस्थापक, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सौमील मजमुदार म्हणाले की, मुलांच्या नियमित वेळापत्रकात तंदुरुस्ती आणि खेळ रुजविणाऱ्या क्रांतिकारी पर्यायाच्या दृष्टीने आमचे उद्दिष्ट आहे. मुलांचा बहुतांशी वेळ हा स्क्रीनसमोर जातो. त्यांचा हा स्क्रीनटाईम अधिक फायदेशीर असणे आवश्यक ठरते. मुलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती याकडे आमचा कायम कटाक्ष असतो.

स्पोर्ट्झ व्हिलेजविषयी:

स्पोर्ट्झ व्हिलेज हा भारतातील सर्वात मोठा युवा क्रीडा मंच मानला जातो. याची स्थापना वर्ष 2003 मध्ये करण्यात आली. स्पोर्ट्झ व्हिलेजचे तत्त्वज्ञान: (i) मुलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती सुधारणे, (ii) प्रत्येकाला खेळाच्या जादूचा अनुभव करून देणे.


Share this Newz