‘We maratha Smart Kid 2020’ स्पर्धेत सोलापूरची हिंदवी सुधीर राऊत प्रथम

फेसबुकद्वारे घेतली होती ऑनलाइन स्पर्धा
Share this Newz

पुणे :
‘आम्ही मराठा’ या मराठ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रुपच्या वतीने आयोजित ‘We Maratha Smart Kid 2020’ स्पर्धेत हिंदवी सुधीर राऊत (नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) ही चिमुकली विजेती ठरली आहे. हिंदवीला ‘We Maratha Smart Kid 2020’ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत मराठा बांधवांनी आपल्या लहानग्यांचा समावेश करत मोठा प्रतिसाद नोंदविला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील 103 मुला-मुलींनी सहभाग घेतला. 10-10 जणांची फेरी करून अतिंम दहा जणांची निवड करण्यात आली. यात हिंदवी राऊतने प्रथम क्रमांक पटकावला.

दरम्यान, अंतिम फेरीतील इतर सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र कुरियरद्वारे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती We Maratha Founder अनिरुद्ध शिवाजी शेलार, सोशल मीडिया प्रमुख सुधीर सोनवणे, महाराष्ट्र राज्य प्रमुख मयूर पाचोरे, सरचिटणीस विशाल बोरसे, राज्य समन्वयक अमित धावडे, महिला विंग प्रमुख स्नेहल कदम पाटील, सोशल मीडिया समन्वयक माऊली इंगळे यांनी दिली.


Share this Newz