मुंबई :
आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणामुळे कमॉडिटी बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोमवारी (दि. 24) सोने ३०१ रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा भाव ५१७१५ रुपये प्रती दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात ४०१ रुपयांची घसरण झाली असून, चांदीचा भाव ६६६६६ रुपये प्रतिकिलो झाला आहे.
गेल्या आठवड्यात सोने १५०० रुपयांनी, तर चांदीचा भाव १६५० रुपयांनी कमी झाला होता. यापूर्वी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५६१९१ रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर गेला होता. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९४७ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव प्रती औंस २६ डॉलर आहे.







Leave a Review