वॉशिंग्टन :
अमेरिकेने इराणवर पुन्हा निर्बंध आणण्यासाठी ३० दिवसांचे काउंटडाउन सुरू केले आहे. इराणवरील निर्बंधांमध्ये शस्त्रांवरील निर्बंधांचाही समावेश आहे. मात्र, अमेरिकेला इराणवरील निर्बंधाच्या प्रस्तावावर जुन्या मित्रांचीही साथ मिळत नसल्याचे समोर आले आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियमसह चीन, रशिया व्हिएतनाम, नायजर, दक्षिण आफ्रिका, सेंट व्हिसेंट, इंडोनेशिया आदी देशांनीदेखील अमेरिकेच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यामुळे अमेरिकेला जोरदार धक्का बसला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील १३ देशांनी अमेरिकेच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यामुळे अमेरिका इराणविरोधी मोहिमेत एकटा पडला असल्याचे चित्र आहे. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषेदत काही दिवसांआधीच अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. आता अमेरिका पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे.







Leave a Review