Thenewzbiz Team, नवी दिल्ली :
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, पिवळ्या धातूच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढल्यामुळे मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 1 हजार 182 रूपयांनी वाढून 54 हजार 856 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
It is necessary that you use top quality paper for the purpose essay writers online of your printed content.
चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, जोरदार मागणीमुळे आज चांदीचा भाव 1 हजार 587 रुपयांनी वाढून 72,547 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 2,005 डॉलर आणि चांदीचा भाव प्रति औंस 28.15 डॉलर इतका झाला आहे. या संदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे 2,000 अमेरिकी डाॅलरच्या वर व्यवहार होत आहेत, त्यामुळे देशांतर्गत सोन्याचा किमंतीवर परिणाम होताना दिसत आहे.
सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर 340 रुपयांनी वाढून 53,611 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले होते. चांदीबद्दल सांगायचं झालं तर काल चांदीचा दर 1,306 रूपयांनी वाढून 69,820 रुपये प्रति किलो इतका होता.







Leave a Review