पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकत आत्तापर्यंत सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या गैर – काँग्रेसी पंतप्रधान बनण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आपले सर्व कार्यकाळ मिळून २२६८ दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते. आत्तापर्यंत काँग्रेसेतर नेत्यांमध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा रेकॉर्ड वाजपेयींच्या नावावर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी हा रेकॉर्ड तोडलाय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळाला होता. मोदींनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपनं पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. भारतीय इतिहासात ते सर्वाधिक काळ सेवा देणारे चौथे पंतप्रधान बनलेत.
अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा भारताच्या पंतप्रधानपदी आरुढ झाले होते. पहिल्यांदा १९९६ मध्ये ते पंतप्रधान बनले मात्र बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यानंतर १९९८ आणि १९९९ मध्ये ते पुन्हा पंतप्रधान बनले आणि २००४ पर्यंत सत्तेत राहिले. पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले होते.







Leave a Review