सचिन अहिर यांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हाकेला साद ; धनुष्यबाण घेतले हाती

Share this Newz

मुंबई : विधान परिषदेची उपसभापतीपदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाकेला ओ देत धनुष्यबाण हाती घेतले आहे.  दरम्यान, सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतअर्ज दाखल केला.

विशेष म्हणजे आमदार अहिर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू होते. आदित्य ठाकरें यांच्यासोबत त्यांचे चांगले जमत होते. विचार जुळत होते. सचिन अहिर यांच्या शिवसेना शिंदे गट प्रवेशामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज सकाळपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी कुणाला संधी मिळणार याची चर्चा होती. वेगवान राजकीय हालचाली झाल्यावर आज अचानक शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली. या धक्कादायक राजकीय घडामोडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ आणखी कमी झाले आहे. आता ठाकरे गटाकडे केवळ ५ आमदार उरले आहेत. सचिन अहिर यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे.

 ज्यांना सगळं काही मिळतं तेच निघून जातात. कुणाच्या जाण्याने धक्का बसत नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे. आमचं तिकडचं काम बोलेल. तुम्हाला अजून काय हवंय, आणखी काय ओरबाडणार, सगळ्या परिवाराला काही ना काही दिलंय. -आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना ठाकरे गट


Share this Newz