आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर’ विषयावर प्रशिक्षण संपन्न

Share this Newz

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता ’कार्यालयीन कामकाजात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात  आले होते. या प्रशिक्षणात नाशिकचे विभागीय प्रशिक्षण संस्थेचे संदीप पाटील यांनी कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती दिली.
यावेळी संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कृत्रिम तं़त्रज्ञानाचा वापर कार्यालयीन कामकाजात केल्यास अधिक गतिमानता येते. तंत्रज्ञानाच्या विविध टुल्सचा वापर केल्यास कार्यालयीन पत्र, टिप्पण्या करतांना व्याकरणातील अडचणी व चुका टाळता येतात. तंत्रज्ञानाचा वापर करुन माहितीचे विश्लेषण, आराखडे, विविध तक्ते, आलेख व मु्द्यांच्या स्वरुपात सादरीकरणासाठी कमी वेळात करता येते. दैनंदिन कामकाजात पत्रलेखन, टिपणी लेखन, सादरीकरण, अधिसुचना काढणे, बॅनर तयार करणे व्हिडीओ एडिटिंग आदी बाबी ए.आय.च्या मदतीने तात्काळ करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शासकीय कामकाजात केल्यास काम जलद व सुलभ होते. यासाठी सर्वांनी कौशल्यवाढीवर भर देऊन अद्ययावत तंत्रज्ञानाचा सकारात्मतेने वापर करावा असे त्यांनी सांगितले.
शासनाने आदेशित केल्याप्रमाणे तसेच कुलगुरु, कुलसचिव यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांना कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर व कौशल्याची माहिती देऊन प्रशिक्षित       करण्यात आले.
या प्रशिक्षणाकरीता सुरेश शिंदे, राहूल विभांडिक, मालिका पाटील, नंदकिशोर दहिवतकर, प्रविण सोनार, तुषार शिरोडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


Share this Newz