पिंपरी, प्रतिनिधी : कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या ‘अंधारावर सूर्य गोंदला’ आणि ‘सूर्यांधकारात माणूस’ द्वितीय आवृत्ती या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उद्या (रविवार, दि. १९) सायंकाळी सहा वाजता नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील कै. श्रीपती गांगुर्डे सभागृहात संपन्न होणार आहे.
कवी गायकवाड यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विश्वास वसेकर आणि रजत प्रकाशन छत्रपती संभाजीनगरचे प्रकाशक अशोक कुमठेकर उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कवी संजय गायकवाड यांनी केले आहे.







Leave a Review