तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी : येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या फार्मसी महाविद्यालयातील प्रा.गुलाब शिंदे यांना अपेक्स युनिव्हर्सिटी जयपूर राजस्थान या विद्यापीठाची फार्मासुटिकल सायंन्स या विषयात पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली.
डॉ. गुलाब शिंदे यांनी “फॉर्मुलेशन अँड इव्यालुअेशन ऑफ हर्बल फिल्म फॉर्मिंग स्प्रे हॅविंग वुन्ड हिलिंग ऍक्टिव्हिटी” या विषयावर शोध प्रबंध सादर केला. या शोधप्राबंधासाठी जयपूर येथील डॉ.पंकजकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे , कार्यवाह चंद्रकांत शेटे , विश्र्वस्त निरूपा कानिटकर, संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि इंद्रायणी विद्या मंदिर परिवारातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी सर्वांच्या वतीने डॉ. गुलाब शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.







Leave a Review