पिंपरी, प्रतिनिधी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त पुणे अकॅडेमी फॉर कॉम्पेटीटीव एक्झाम्स सेंटरमध्ये सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचे (निबंध लेखन, वकृत्त्व स्पर्धा, मैदानी स्पर्धा) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब ओहोळ (मुख्याध्यापक जि. प. प्राथामिक शाळा – सांगवडे) व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धांमधील विजयी उमेदवाराना प्रमुख पाहुण्यांच्या हातून बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
पुणे अकॅडेमी फॉर कॉम्पेटीटीव एक्झाम्सचे संचालक श्री. रणजीत टकले यांनी आभार मानले.









Leave a Review