अण्णासाहेब मगर महाविद्यालयात चार कार्यशाळा आणि एक व्याख्यानमाला संपन्न

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष अनुदानामुळे , बॉटनी फेस्ट-२०२५ अंतर्गत दिनांक २०, २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी एकूण चार कार्यशाळा आणि एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. धर्माकुमार नायडू, सिरम इन्स्टिटयूट , विभागप्रमुख, हॉर्टीकलचरल डिव्हिजन, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते झाले. या सर्व कार्यशाळेचे नियोजन प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. किरण रणदिवे, सह-समन्वयक प्रा.डॉ. सुनीता दांनई -तांभाळे, प्रा. डॉ. शिंदे बाजीराव, सहा. प्रा. अर्चना श्रीचिप्पा, सहा. प्रा. वैभव कोडलिंगे, सहा. प्रा. शुभम काशीद यांनी केले.

या कार्यशाळांमध्ये दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आणि वनस्पतिशास्त्रातील आधुनिक विषयांवरील व्याख्याने आणि प्रशिक्षण देण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष अनुदानामुळे या बॉटनी फेस्ट -२०२५ चे आयोजन आदरणीय राजेंद्र घाडगे, संदीप कदम, ए. एम.जाधव, मोहनराव देशमुख आणि एल . एम, पवार यांच्यामुळेच आम्ही करू शकलो, असे मत कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. रणदिवे यांनी मांडले. या कार्यक्रमांमध्ये उप-प्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, उप-प्राचार्य प्रा. डॉ. शुभांगी औटी आणि उप-प्राचार्य अनिल जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले.

यामध्ये २० फेब्रुवारी २०२५ रोजी निवृत्त सहयोगी प्रा. सावळाजकर यांनी बोन्साय कसे बनवावे यावर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी बोन्साय चे महत्व जाणून घेतले. हि कार्यशाळा घेत असताना विद्यार्थ्यांना उद्योग निर्मितीवरही सहयोगी प्राध्यापक श्री. सावळाजकर यांनी बोन्साय उद्योग किती सहजपणे केला जातो आणि हमखास अर्थार्जन होते असाही ते म्हणाले. दुपारची सत्रात सुधीर सावंत यांनी टेरर्स गार्डनिंग कसे करावे यावर बोलत निवडुंग किती जपायला हवेत ते साध्या भाषेत सांगितले. निवडूंग बद्दलही खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक निवडुंग किती सुंदर असतो.

२१ फेब्रुवारी रोजी बॉटनी फेस्ट-२०२५ अंतर्गत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण, पुणे मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बेनीआयामीन यांनी पश्चिम घाटातील नेचे विविधता या विषयावर व्याख्यान दिले. नेच्यांमधील विविधता आणि त्यांचा निसर्गातील कार्य या गोष्टी खरोखरच अभ्यासण्यासारख्या आहेत. या व्याख्यानानंतर सोनाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांचे पेटंट कसे करावे आणि नॅनोटेकनॉलॉजि या आधुनिक विषयांवर व्याख्यान झाले. त्यांच्या व्याख्यानादरम्यान त्यांनी संशोधन करत असताना आलेल्या डाळिंबाच्या अनुभवातून पेटंट निर्मिती कशी झाली, याचा इतिहास सांगितला.

भारतीय वनस्पती सर्वेक्षण या संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. रश्मी दुबे यांनी सूक्ष्म बुरशी आणि त्यांचे उपयोग या खूपच दुर्लक्षित विषयावर प्रकाश टाकला. औषध निर्मिती शास्त्रामध्ये या बुरशींचा किती लाख मोलाचा उपयोग आहे हे नमूद केले. या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प भारती विद्यापीठाचे , डॉ . सुरेश जगताप यांनी पावरा आदिवासी जमात आणि त्यांची औषध शास्त्र प्रणाली या विषयावर सखोल माहिती. बॉटनी फेस्ट-२०२५ च्या शेवटच्या दिवशी, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पुन्हा दोन कार्यशाळा आयोजित केल्या होत्या . यामध्ये पहिली कार्यशाळा हि उभी बाग प्रणाली या विषयावर झाली . यामध्ये कृषी विज्ञान केंद्र , बारामती येथील श्री.कणसे यांनी सखोल माहिती दिली. बॉटनी फेस्ट-२०२५ मधील कार्यशाळेचा शेवट हा सौ. दळवी यांच्या हर्बल प्रॉडक्ट तयार करण्याने झाला. यामध्ये त्यांनी विद्यर्थ्यांकडून यामध्ये त्यांनी विद्यर्थ्यांकडून कॅलेणझिन मिल्क , हर्बल शाम्पू , हर्बल फेस पॅक, हर्बल साबण इत्यादी हर्बल उत्पादने तयार करून घेतली.

यानंतर संपूर्ण बॉटनी फेस्ट-२०२५ च्या सर्व कार्यक्रमांचा आढावा समन्वयक प्राध्यापक डॉ. किरण रणदिवे यांनी घेतला.. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या उस्फूर्थ प्रतिक्रिया नोंदविल्या. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले कि अभ्यासक्रमाबरोबरच अश्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विषयातील नवनवीन संधी व आव्हाने कळतात. कार्यशाळांचे आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित होणे काळाची गार आहे असेही ते म्हणाले. यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राद्यापक अर्चना श्रीचिप्पा व सहाय्यक प्राद्यापक वैभव कोडलिंगे यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्व या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्व प्रथम , द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञानाचे स्वयंसेवकानी खूप कष्ट घेतले यामध्ये सार्थक चौधरी, स्नेहल गावडे, दीपक गुजलवार, दीप्ती गंगथडे, नीलम बोरांना, हेमाडे कल्पना, नंदीनी पवार, खुडे अनुष्का, जोएल डेसोझा, वैष्णवी जांभुळकर, सोनाली फंड, सानिका भालेराव, वैष्णवी शेळके, श्रेया यादव, वट्टे अंकिता, उकरंडे श्रेया, सानिका भालेराव, स्वप्नील गुंजाळ, हर्षल बडीजेर, घाडगे राजेंद्र, भागवत मानवदा यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यालयातील अधिक्षक गणेश साबळे, श्री. बेसके, श्री. राखुंडे , श्री. पोमण, श्री. औटी , सौ. कोरडे, श्री. जेधे, सौ. मोरे, सौ. प्रणाली, पवार आर. बी., श्री. संजय पवार व श्री. खोमणे यांचे विशेष सहकार्य मिळाले.


Share this Newz