संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे स्वच्छता अभियान राबवून संत गाडगेबाबा जयंती साजरी

Share this Newz

पिंपरी, प्रतिनिधी :
पिंपळे गुरवमधील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने स्वच्छता अभियान राबवून संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर काशीद पार्क व बीआरटी रोड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांनी सहकाऱ्यांसह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.
यावेळी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके म्हणाले, काशीद पार्कमध्ये 2016 मध्ये 2 ते 3 ट्रक एवढा कचरा होता की लोकांना जाताना नाक दाबून जावे लागत होते. त्यावेळी वृक्षमित्र अरुण पवार व तानाजी जवळकर यांच्या सहकार्यातून पत्रा शेडची उभारणी करून कचरा टाकायच्या जागी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केले. स्वच्छता करून त्या ठिकाणी महिनाभर माणूस ठेऊन त्याठिकाणी 6 ते 7 हजार लोकांचे आरोग्य धोक्यात यायचे थांबले. तसेच 2016 च्या स्वच्छता अभियानांतर्गत काशीद पार्कमधील सर्व गल्ल्या, आळंदी, शिरगाव, देहूगाव, गडकिल्ले या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून स्वच्छता अभियान राबविले.
अरुण पवार म्हणाले, की स्वच्छता कर्मचारी दररोज स्वच्छता ठेवतात. तेच खरी देशसेवा करतात. त्यामुळे त्यांचा उचित सन्मान झाला पाहिजे, असे सांगत त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2023 व 2024 या दोन्ही वर्षात संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघास महापालिकेतर्फे स्वच्छता पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पीसीएमसी पुरस्कृत स्वच्छता चॅम्पियन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, सूर्यकांत भागवत, सूर्यकांत कुरुलकर, दामू राणे, चांदमल सिंघवी, पोपट चव्हाण, दौलतराव जाधव, गणेश ठाकरे, शंकर टोपे, विशाल कुंभार, श्रीधर राऊत, श्रीधर साबळे, धनेशकुमार पुरोहित, मोहन भोईटे, दत्तात्रय पाटकर, पितांबर सरोदे, अशोक नवगण, सुरेश दिघे, अनिल भोळे, शत्रुघन धुळे, आनंदराव वानखेडे, दत्तात्रय खताळ, बाळासाहेब वाघ, संजय पाडेकर, दौलतराव जाधव आदी मान्यवर सहभागी झाले होते.


Share this Newz