पँथर नेते अशोक कांबळे यांचे दुःखद निधन

Share this Newz

पुणे, प्रतिनिधी : पँथर नेते अशोक कांबळे यांचे 75 व्या वर्षी ह्रदयविकाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुली व पत्नी असा परिवार आहे.

पन्नास वर्षे पॅंथर चळवळीमध्ये अशोक कांबळे यांनी काम केले होते. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, महिला सबलीकरण चे प्रश्न, झोपडपट्टी धारकाचे प्रश्न तसेच झोपडपट्टी निर्मूलनाच्या प्रश्नावर आंदोलन केले होते, भूमीहिनासाठी आंदोलन केले होते दलित पॅंथरच्या काळात तीव्र आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होता, आंदोलनाच्या माध्यमातून स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा रास्ता रोको मोरारजी देसाई यांचा रास्ता रोको पुणे शहरातील विविध आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. सुशिक्षित बेरोजगारांना रिक्षावाटप केले होते.

त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील, राजकीय पक्षातील व संघटनेतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आदरणीय भन्ते हर्षवर्धन, मोटधरे सर, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, एडवोकेट अविनाश साळवे, सिद्धार्थ धेंडे, जयदेव गायकवाड, अशोक बापू गायकवाड, असित गांगुर्डे, वसंत दादा साळवे, रोहिदास गायकवाड, सुखदेव सोनवणे, अरुण खोरे, शैलेंद्र चव्हाण, विजय बहुले, विजय जाधव, तलाठी कांबळे सर, बाळासाहेब वाघमारे, अंकुश सोनवणे, युवराज बनसोडे, संजय सोनवणे, प्रदीप कांबळे, राहुल डंबाळे, विवेक चव्हाण, रामभाऊ डंबाळे, बबलू पिल्ले, सुनील खरात, शैलेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, महेश शिंदे, लता राजगुरू, बापू भोसले, बाबुराव घाडगे, शाम सदाफुले, महिपाल वाघमारे, राजू शिरसाठ, संजय आल्हाट, अशोक शिरोळे, श्याम गायकवाड, मिलिंद आहेर, सुवर्णाताई डंबाळे, दीपक गायकवाड, विशाल शेवाळे, डॉ. पी टी गायकवाड, नागेश भोसले, हलीमा शेख, भिमाले, संदीप गायकवाड, रमेश जगताप, भगवान गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
स्व. अशोक कांबळे यांची सर्वपक्षीय शोकसभा दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता तिरुपती मंगल कार्यालय लेन नंबर दोन टिंगरे नगर येथे आयोजित करण्यात आली आहे.


Share this Newz