द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन, संत तुकाराम पोलीस स्टेशन, तसेच वाहतूक विभागातील पोलीस बांधवांना तिळगुळ वाटप करीत मकरसंक्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक (गुन्हे) दीपक गोसावी, संत तुकाराम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे, एपीआय अतुल शेटे, पोलीस अधिकारी सागर आढारी, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा स्वरूपाताई खापेकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंह, मावळ लोकसभा युवती संपर्क प्रमुख सायली साळवी, पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा अध्यक्ष राज नाईक, पिंपरी – चिंचवड शहर सचिव राकेश सायकर, चिंचवड विभाग उपाध्यक्ष उदय वाडेकर, संत तुकारामनगर विभाग अध्यक्ष केशव त्रिभुवन, रमेश अवसरमल, रविकांत सागवेकर, दीपक साबळे, प्रशांत भालेराव, मधूकर साठे, हृषिकेश वारे, वैभव हेंद्रे आदी उपस्थित होते.

गजाननभाऊ चिंचवडे म्हणाले, की ऊन, वारा, पाऊस सोसत शहरातील रहदारी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण राखणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आपला स्नेह कायम राखून आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. याच हेतूने पोलीस बांधवांना तिळगुळ वाटप करत त्यांच्यासोबत मकर संक्रात साजरी करण्यात आली.












Leave a Review