द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेजचे किक बॉक्सिंगमध्ये यश

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवर किक बॉक्सिंग स्पर्धेत द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून यशाची परंपरा कायम राखली. या स्पर्धेत चार विद्यार्थ्यांनी यश मिळवून चॅम्पियनचा मान मिळवला.

श्रेयांश रणदिवे ( ब्राँझ पदक) तसेच मनस्वी शिंदे ( ब्राँझ पदक) सिमलोन जाधव व रुद्र जाधव यांनी घवघवीत यश मिळवून त्यांनी शाळेचे नाव उज्वल केले.या सर्व विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट चे शिक्षक सांबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव शंकर जगताप, उपाध्यक्ष विजयअण्णा जगताप, सदस्य सूर्यकांत गोफणे, डॉ.विकास पवार, प्रा.बामणे, सदस्या स्वाती पवार, प्राचार्य इनायत मुजावर, देवराम पिंजन यांनी अभिनंदन केले.


Share this Newz