भिडे वाडा स्मारकाचे भूमिपूजन; आंबेडकरी चळवळीचे यश : परशुराम वाडेकर

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : भिडे वाडा, पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू, ज्याठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या महत्त्वपूर्ण जागेवर फुले दांपत्याचे स्मारक उभारण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. हे केवळ एक ऐतिहासिक क्षण नाही, तर आंबेडकरी जनतेच्या लढ्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यावेळी महापालिकेसमोर झालेली आंदोलने, उच्च न्यायालयात केलेली कायदेशीर लढाई, आणि त्या लढाईत दिवंगत प्रा. हरी नरके सरांची मला केलेली मदत, या सर्व गोष्टी आठवतात. निमित्ताने आम्ही केलेली अनेक आंदोलने ,मोर्चे आमच्यावर झालेल्या पोलीस केसेस
या सर्व आंदोलनामध्ये विद्यार्थी कार्यकर्ते महिला कार्यकर्ते दीर्घकाळ संघर्षामध्ये सहभागी होते त्या सर्व मित्रांचे अभिनंदन खूप आनंद होत आहे की आज देशाचे पंतप्रधान या स्मारकाचे भूमिपूजन करत आहे .

ज्यावेळी न्यायालयीन लढाईत विजय मिळवला, तेव्हा आंबेडकरी कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला. उद्या त्या आनंदाला जल्लोषात रूपांतरित करण्याची आवश्यकता आहे.


Share this Newz