द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वैष्णव लावंड व आदिती नाईक यांच्या Fabrikolor स्टार्टअप प्रकल्पाला एस. एम. जोशी कॉलेजमध्ये झालेल्या स्टार्टअप स्पार्क फेस्ट 2K24 द्वारा आयोजित RS07 इनोव्हेटर्सच्या सहकार्याने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाऊंडेशन सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड इनक्युबेशन, रयत शिक्षण संस्था, सातारा (LBPIF-CIII) या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. अनुराधा कांबळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे यांनी वैष्णव लावंड व आदिती नाईक यांचे अभिनंदन केले.







Leave a Review