विद्यार्थ्यांनी आयुष्यातील यशाचे नियोजन हे पदवीच्या प्रथम वर्षापासूनच केले, तर यश नक्कीच : प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : विद्यार्थ्यांनी आयुष्यातील यशाचे नियोजन हे पदवीच्या प्रथम वर्षापासूनच केले, तर यश नक्कीच मिळेल, असा कानमंत्र पुणे ज़िल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पुणे ज़िल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरण कार्यक्रम (Induction Program) आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या शुभहस्ते वृक्षाला पाणी देऊन अनोख्या पद्धतीने करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना, महाविद्यालयातील सुविधा आणि संशोधनातील संधी यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांच्या मार्गदर्शनानखाली, वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक डॉ. किरण रणदिवे यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने केले. या कार्यक्रमामध्ये विज्ञान विभागाच्या सर्व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये मुख्यत्वे डॉ. लतेश निकम (रसायनशास्त्र विभाग), प्रा. डॉ. बाजीराव शिंदे (वनस्पतीशास्त्र विभाग), डॉ. शरद गिरमकर (प्राणीशास्त्र विभाग), डॉ. वर्षा एरम (गणित विभाग), डॉ. शुभांगी शिंदे (सुक्षमजीवशास्त्र विभाग) यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव कोडलिंगे यांनी केले, कार्यक्रमाचा आढावा प्रा. शुभम काशीद यांनी घेतला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये राखुंडे , सचिन शिंदे , घोरपडे मामा, संजय पवार, पोमण मामा, आर. बी. पवार, यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले . या कार्यक्रमाला डॉ. निंबाळकर , प्रा. शहा , प्रा. गुजराथी, प्रा. डॉ. दानाई-तांभाळे, प्रा. शैला धोत्रे, प्रा. नेवासकर व प्रा. अविनाश राठोड यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रा. अर्चना श्रीचिप्पा यांनी मानले.


Share this Newz