बीबीए व बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठीची मोफत कार्यशाळा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आयआयएमएस च्या वतीने बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए व बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन बीसीए या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठीची मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.

दिनांक 17 व 18 मे 2024 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ऑनलाइन स्वरूपात ही कार्यशाळा होणार आहे.
प्रवेश परीक्षेसाठीचे संभाव्य प्रश्न व तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात येणार आहे,
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले आहे.
या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करावी
https://forms.office.com/r/JtHdfkATMb

किंवा खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
डॉ पुष्पराज वाघ : 9922950687
पवन शर्मा : 7350014526
असे यशस्वी संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Share this Newz