यशस्वी संस्थेत प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त संस्थेचे सोर्सिंग मॅनेजर नितीन थेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी संस्थेच्या संचालिका शोभा कुलकर्णी,आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे,संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी देविदास माळी, दिनेश शर्मा, अमृता तेंडुलकर, मानसी कुदळे,पवन शर्मा, ऍड.अभिलाषा कुलकर्णी, योगेश रांगणेकर आदींच्या उपस्थितीत ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

सूत्रसंचालन अमृता तेंडुलकर यांनी, तर आभार आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी मानले.

याप्रसंगी संस्थेच्या देशभरातील सर्व विभागांमधून आलेले विभागप्रमुख, प्राध्यापक, अन्य कर्मचारी यांच्यासह आयआयएमएसच्या एमबीए व एमसीए विद्याशाखेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.


Share this Newz