द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :
अण्णासाहेब मगर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मु पो. पिंगोरी ता. पुरंदर या ठिकाणी २० ते २६ डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संत गाडगेबाबांच्या स्मृतीस अभिवादन करून शिबीराचे उद्घाटन आज २० डिसेंबर रोजी दु. ३ वा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ सदानंद भोसले यांच्या उपस्थितीत एल. एम. पवार यांच्या हस्ते होणार आहे. शिबीराचा समारोप पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि ॲड. मोहनराव देशमुख व ए. एम जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सलग समपातळी चर व मतदान जागृती ही या शिबीराची महत्त्वाची संकल्पना असून स्वच्छता, मैदान सपाटीकरण, वृक्षारोपण, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, ईला फाउंडेशन यांच्या वतीने कार्यशाळा, तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर व्याख्याने असे अनेक उपक्रम या शिबिरात असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी सांगितले.
यापूर्वी गावामध्ये एक दिवसीय शिबीरांतर्गत माती, पाणी,प्राणी, वनस्पती भाषा, पर्यटन संधी, राजकीय स्थिती, आर्थिक स्थिती यांचा अभ्यास करून काढण्यात आलेले निष्कर्ष ग्रामस्थांसमोर मांडले जाणार आहेत.
शिबीरामध्ये श्रीकांत लक्ष्मीशंकर यांचे महिला सबलीकरण तर अनिता गुर्जर यांचे महिला सबलीकरण या विषयावर, ईला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे, संदीप जगधने, प्रा. रामकुमार कदम, डॉ मिलींद कसबे, भालचंद्र कोळपकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. योगाभ्यास, खेळ, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असे उपक्रम शिबिर कालावधीत घेतले जाणार आहेत.
पिंगोरी गावचे सरपंच संदीप बाबासाहेब यादव, उपसरपंच भाग्यश्री प्रवीण शिंदे, माजी सरपंच जीवन नंदकुमार शिंदे, माजी उपसरपंच प्रकाश रमेश शिंदे, सदस्या सुषमा राहुल भोसले, अनिता गणेश शिंदे, ज्योती दत्तात्रय शिंदे, ग्रामसेवक मोहिनी कुदळे यांच्या सहकार्याने गावांमध्ये ग्रामस्थांसाठी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिराचे नियोजन डॉ. सविता कुलकर्णी प्रा. नितीन लगड डॉ. अंजू मुंढे, प्रा गौरव शेलार, तसेच वंदना सोनवले, डॉ. डी. जी. आवटे यांच्या सहकार्याने करणार आहेत.







Leave a Review