द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :
- आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतात ३२ आणि इतर देशांमध्ये १२ नवीन दालने सुरू करणार
- आर्थिक वर्ष २०२५ अखेरपर्यंत महाराष्ट्रात आणखी १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४,००० नोकऱ्या निर्माण करणार
विविध ११ देशांमधील ३३० हून अधिक दालनांसह जागतिक स्तरावरील सहाव्या क्रमांकाचे आभूषण विक्रेते मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, मुंबईतील अंधेरी पूर्व येथे ‘मलाबार नॅशनल हब (एम-एनएच)‘, हे भारतातील परिचालनाचे मध्यवर्ती केंद्र सुरू केले आहे. या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम पी अहमद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मलाबार समूहाचे व्हाईस चेअरमन, केपी अब्दुल सलाम, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतीय व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक अशेर ओ, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या आंतराष्ट्रीय व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक शामलाल अहमद, समूहाचे कार्यकारी संचालक ए. के. निशाद, के.पी. वीरनकुट्टी, मायनकुट्टी, अब्दुल मजीद, ए.के. फैजल, अब्दुल्ला, पश्चिम विभागीय प्रमुख फनजीम अहमद, इतर अधिकृत मान्यवर, मलबार समूहाचे व्यवस्थापकीय संघ सदस्य, उद्योग भागीदार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तब्बल ५०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या एम-एनएच द्वारे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची अनेक कार्य जसे की किरकोळ विक्री, खरेदी आणि पुरवठा साखळी, ई-कॉमर्स, डिजिटल गोल्ड, डिजिटल मार्केटिंग, सीआरएम, ओम्नीचॅनेल ऑपरेशन्स, मर्चेंडाइजिंग आणि बुलियन, कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि बी२बी व्यवहार विभाग, मानव संसाधन आणि कायदे विभाग वगैरे सर्व एकाच छताखाली आणली गेली आहेत. एम-एनएच समूहासाठी वाढीच्या एका नवीन युगाची सुरुवात करेल आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला तिची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग सुकर करून ब्रँडला नवीन उंचीवर नेईल. कंपनीने एम-एनएचचे कामकाज चालविण्यासाठी ४५० हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि एक प्रमुख जागतिक दागिने आणि हिरे व्यापार केंद्र असल्याने, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने आपल्या धोरणात्मक व्यूहनितीनुरूप या शहरात आपल्या राष्ट्रीय कामकाजासाठी मध्यवर्ती कार्याधार तयार केला आहे.
एम. पी. अहमद म्हणाले, आम्ही आमच्या प्रवासाची ३० गौरवशाली वर्षे साजरी करत असताना, मलाबार नॅशनल हबचे उद्घाटन हा आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण आणि एक महत्त्वाची खूणगाठ आहे. हे आमच्या जागतिक वाढीच्या आकांक्षेला अधिक चालना देईल आणि वाढीच्या पुढील टप्प्याचा पाया रचेल. एम-एनएचमधील आमच्या सर्व प्रमुख कार्याचे एकत्रीकरण झाल्याने कार्यक्षमता वाढेल आणि व्यवस्थापन सुस्थित केले जाईल, कारण आम्ही देशभरात १९० पेक्षा जास्त असलेले किरकोळ विक्री दालनांचे आमचे जाळे आणखी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.
मुंबईत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा राष्ट्रीय मध्यवर्ती केंद्र सुरू होणे, हे महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण आणि अनुकूल व्यवसाय परिसंस्था असल्याची एक मजबूत पुरावाच सादर करणारे आहे, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दागिन्यांच्या व्यापारात बदल घडवून आणण्याच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि सामाजिक कारणांना चालना देण्याच्या ब्रँडच्या सुप्रसिद्ध परंपरेसह, मला विश्वास आहे की, मलाबार नॅशनल हब आपल्या राज्याच्या विकासाचा एक प्रमुख समर्थक असेल आणि जागतिक हिरे आणि सोन्याच्या व्यापारात आपला वारसा अधिक समृद्ध करेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ईएसजी (पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन) मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जाते. इमारतीच्या डिझाइनमध्ये विविध पर्यावरणीय आणि शाश्वत उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे आणि नवीन सुविधा ‘लीड गोल्ड’ प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत आहे.







Leave a Review