कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंती निमित्त ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन चित्रप्रदर्शन सुरू

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची यंदा 133 वी जयंती आहे. या निमित्ताने कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023” या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन  येथे बाबूराव पेंटर यांच्या कन्या विजायमाला बाबूराव पेंटर यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची सून अनुराधा अरविंद मेस्त्री , नातू अर्जून अरविंद मेस्त्री, नात प्रिया रणजीत बॅनर्जी, चित्रप्रदर्शन स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर ( मुंबई), संजय शेलार ( कोल्हापूर) आदी उपस्थित होते.

या ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’ मध्ये शनिवार (दि. 3 जून ) सकाळी 9 वा. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा 133 वा जयंती सोहळा व स्पर्धेचा  पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.  या आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण भारतातून 500 हुन अधिक व्यावसायिक कलाकार व कला शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले असून हे  प्रदर्शन 4 जून पर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन येथे सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.


Share this Newz