काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयश्री आणली खेचून

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या रवींद्र धंगेकर यांनी विजयश्री खेचून आणली आहे. ते 11,400 मतांनी विजयी झाले आहेत.

2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारलेली आहे. काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात रवींद्र धंगेकर यशस्वी झाले आहेत. तब्बल 28 वर्षापासून कसबा पेठ भाजपाचा बालेकिल्ला आहे.


Share this Newz